अनंता तुला ते कसे रे स्तवावे
अनंता तुला ते कसे रे नमावे
अनंत मुखांचा शिणे शेष गाथा
नमस्कार साष्टांग श्री साईनाथा
स्मरावे मनी त्वत्पदा नित्य भावे
उरावे तरी भक्तिसाठी स्वभावे
नमस्कार साष्टांग श्री साईनाथा
वसे जो सदा दावया संत लीला
दिसे अज्ञ लोकापरी जो जनाला
परी अंतरि ज्ञान कैवल्यदाता
नमस्कार साष्टांग श्री साईनाथा
बरा लाधला जन्म हां मानवाचा
नरा सार्थका साधनीभुत साचा
धरु साईप्रेमा गळाया अहंता
नमस्कार साष्टांग श्री साईनाथा
धरावे करी सान अल्पज्ञ बाला
करावे आम्हा धन्य चुंबोनि घाला
मुखी घाल प्रेमे खरा ग्रास आता
नमस्कार साष्टांग श्री साईनाथा
सुरादिक ज्यांच्या पदा वंदिताति
शुकादिक ज्यांचे समानत्व देती
प्रयगादि तीर्थेपदि नम्र होता
नमस्कार साष्टांग श्री साईनाथा
तुझ्या ज्या पदा पाहता गोपबाली
सदा रंगली चित्स्वरुपि मिळाली
करी रासक्रीड़ा सवे कृष्णनाथा
नमस्कार साष्टांग श्री साईनाथा
तुला मागतो मागणे एक द्यावे
करा जोडितो दिन अत्यंत भावे
नमस्कार साष्टांग श्री साईनाथा
अक्षयरूप अवतारा सर्वही व्यापक तू
श्रुतिसारा अनुसया त्रिकुमारा
काशी स्नान जप, प्रतिदिवशी
कोल्हापुर भिक्षेसि निर्मल नदी तुंगा
जल प्राशी निद्रा माहुर देशी
झोळी लोंबतसे वाम करी त्रिशुल डमरू धारी
पायी पादुका जपमाला कमंडलू मृगछाला
तत्पर तुझ्या या जे ध्यानी अक्षय त्यांचे सदानि
या परीध्यान तुझे गुरुराया दृश्य करी नयना या
अक्षयरूप अवतारा सर्वही व्यापक तू
श्रुतिसारा अनुसया त्रिकुमारा