( काळभैरवी आई असुरमर्दनी रौद्ररूपे अवतरली
जगतस्वामिनी जयदेवी जयदेवी सहस्रवदनी
नतमस्तक झाला देव शंभु शिवहरी )
हिम दऱ्या खोऱ्यांच्या पोटी
साऱ्या जगाच्या उभी ती पाठी
पाषाण तांदळा कारले डोंगुरा
चैताची पालखी शेंदूर मस्तकी
अष्टादश गर्जती धरणी भेगती
रमावे तवभजनी भक्तांचीच जननी
चंडमुण्ड सर्वशत्रू पिशभूत पापनाशिणी
अनंतरुपे भुतकाळ रुद्र अवतारिणी
चतुर्भुजे दुर्गे देवी तू परमेश्वरी करी विनाश काल
दैत्य माझी माऊली कस्तुरी मळवट सर्वांगी भूषणे
थोरवी आईची वर्णती पुराणे पायाशी
पोल्हार रुणझुण वाजजी त्रिशूळ डमरू
आई लावण्यागाभा सौम्यात रौद्रात
शोभाच शोभा पापींचा नाश केला