LyricFind Logo
LyricFind Logo
Profile image icon
Lyrics
गर्जा जयजयकार क्रांतिचा गर्जा जयजयकार
गर्जा जयजयकार क्रांतिचा गर्जा जयजयकार
अन्‌ वज्रांचे छातीवरती घ्या झेलून प्रहार
अन्‌ वज्रांचे छातीवरती घ्या झेलून प्रहार
गर्जा जयजयकार क्रांतिचा गर्जा जयजयकार
गर्जा जयजयकार क्रांतिचा गर्जा जयजयकार
आ आ आ आ आ आ आ आ आ आ आ आ

खळखळु द्या या अदय श्रुंखला हातापायात
पोलादाची काय तमा मरणाच्या दारात
सर्पांनो उद्दाम आवळा कसूनिया पाश
पिचेल मनगट परि उरांतिल अभंग आवेश
तडिताघाते कोसळेल का तारांचा संभार
कधीही तारांचा संभार
गर्जा जयजयकार क्रांतिचा गर्जा जयजयकार
गर्जा जयजयकार क्रांतिचा गर्जा जयजयकार
आ आ आ आ आ आ आ आ आ आ आ आ

पदोपदी पसरून निखारे आपुल्याच हाती
पदोपदी पसरून निखारे आपुल्याच हाती
हो‍उनिया बेहोष धावलो ध्येयपथावरती
कधि न थांबले विश्रांतीस्तव पाहिले न मागे
कधि न थांबले विश्रांतीस्तव पाहिले न मागे
बांधु न शकले प्रीतीचे वा कीर्तीचे धागे
एकच तारा, एकच तारा समोर आणिक
पायतळी अंगार, होता पायतळी अंगार
गर्जा जयजयकार क्रांतिचा गर्जा जयजयकार
गर्जा जयजयकार क्रांतिचा गर्जा जयजयकार
आ आ आ आ आ आ आ आ आ आ आ आ

श्वासांनो जा वायुसंगे ओलांडुन भिंत
श्वासांनो जा वायुसंगे ओलांडुन भिंत
अन्‌ आईला कळवा अमुच्या हृदयातिल खंत
अन्‌ आईला कळवा अमुच्या हृदयातिल खंत
सांगा वेडी तुझी मुले ही या अंधारात
सांगा वेडी तुझी मुले ही या अंधारात
बद्ध करांनी अखेरचा तुज करिती प्रणिपात
बद्ध करांनी अखेरचा तुज करिती प्रणिपात
तुझ्या मुक्तिचे एकच होते वेड परि अनिवार
तयांना वेड परि अनिवार
गर्जा जयजयकार क्रांतिचा गर्जा जयजयकार
गर्जा जयजयकार क्रांतिचा गर्जा जयजयकार
आ आ आ आ आ आ आ आ आ आ आ आ

कशास आई भिजविसि डोळे उजळ तुझे भाल
कशास आई भिजविसि डोळे उजळ तुझे भाल
रात्रीच्या गर्भात उद्याचा असे उषःकाल
रात्रीच्या गर्भात उद्याचा असे उषःकाल
सरणावरती आज आमुची पेटतात प्रेते
सरणावरती आज आमुची पेटतात प्रेते
उठतिल त्या ज्वालांतुन भावी क्रांतीचे नेते
उठतिल त्या ज्वालांतुन भावी क्रांतीचे नेते
लोहदंड तव पायांमधले खळाखळा तुटणार
आई खळाखळा तुटणार
गर्जा जयजयकार क्रांतिचा गर्जा जयजयकार
गर्जा जयजयकार क्रांतिचा गर्जा जयजयकार
आ आ आ आ आ आ आ आ आ आ आ आ

आता कर ओंकारा तांडव गिळावया घास
नाचत गर्जत टाक बळींच्या गळ्यांवरी फास
आता कर ओंकारा तांडव गिळावया घास
नाचत गर्जत टाक बळींच्या गळ्यांवरी फास
रक्तमांस लुटण्यास गिधाडे येउ देत क्रूर
रक्तमांस लुटण्यास गिधाडे येउ देत क्रूर
पहा मोकळे केले आता त्यासाठी ऊर
पहा मोकळे केले आता त्यासाठी ऊर
शरिरांचा कर सुखेनैव या सुखेनैव संहार
मरणा सुखनैव संहार
गर्जा जयजयकार क्रांतिचा गर्जा जयजयकार
गर्जा जयजयकार क्रांतिचा गर्जा जयजयकार
अन्‌ वज्रांचे छातीवरती घ्या झेलून प्रहार
अन्‌ वज्रांचे छातीवरती घ्या झेलून प्रहार
गर्जा जयजयकार क्रांतिचा गर्जा जयजयकार
क्रांतिचा गर्जा जयजयकार

WRITERS

Kusumagraj, Kanu Ghosh

PUBLISHERS

Lyrics © Royalty Network

Share icon and text

Share


See A Problem With Something?

Lyrics

Other