LyricFind Logo
LyricFind Logo
Profile image icon
Lyric cover art

Dhnagarachi Mendhara

Apple Music logo
Deezer logo
Spotify logo
Lyrics
आन्‌ धनगराची मेंढरं गा धनगराची मेंढरं
धनगराची मेंढरं गा धनगराची मेंढरं
मातीवाणी काळं कोणी दुधावाणी पांढरं
मातीवाणी काळं कोणी दुधावाणी पांढरं
धनगराची मेंढरं गा धनगराची मेंढरं
धनगराची मेंढरं गा धनगराची मेंढरं

अवो साजिरी दिसत्यात
ही गोजिरवाणी हरणं
पर मानुस लई उफराटा
काळं त्याचं करणं
अवो त्याची भूक लई मोठी
त्याची दानत लई खोटी
सुरी फिरुतिया त्याच्या नरड्यावरती
सुरी फिरुतिया त्याच्या नरड्यावरती
आन्‌ आई-बाच्या चुका पायी बळी जाती लेकरं
आन्‌ आई-बाच्या चुका पायी बळी जाती लेकरं
मातीवाणी काळं कोणी दुधावाणी पांढरं
धनगराची मेंढरं गा धनगराची मेंढरं
धनगराची मेंढरं गा धनगराची मेंढरं

आसं पुराणात लेकरु होतं
त्याचं सरावण बाळं
आंधळं आई-बाप बोललं
काशीला घेऊन चल
जलमदत्याची सेवा केली
दोघं दोन्हीकडं बसली
चालला बिगिबिगी हरणाच्या पाउली चालला बिगिबिगी हरणाच्या पाउली
आन्‌ खांद्यावरी कावड गा वाजतीया करकर
खांद्यावरी कावड गा वाजतीया करकर
मातीवाणी काळं कोणी दुधावाणी पांढरं
धनगराची मेंढरं गा धनगराची मेंढरं
धनगराची मेंढरं गा धनगराची मेंढरं

ऊन सोसवंना उतरला
बघुन एक झाड
आई-बा म्हणालं
घशाला पडली कोरड
भांडं घेऊन गेला फुडं
आलं पान्यामंदी बुडबुडं
तिथं घडु नये ते इपरित घडलं तिथं घडु नये ते सारं घडलं
आन्‌ बाण आला घुसला गा काळजाच्या पातुर
बाण आला घुसला गा काळजाच्या पातुर
मातीवाणी काळं कोणी दुधावाणी पांढरं
धनगराची मेंढरं गा धनगराची मेंढरं
धनगराची मेंढरं गा धनगराची मेंढरं

मोठी कथा हाय्‌ दुनियेला ठावं
सांगणारा सांगून गेला उरलं त्याचं नाव
आता कलियुग आलं
जग उफराटं झालं
अहो बघंल तिथं दिसतंया सारं काळं अहो बघाल तिथं दिसतंया सारं काळं
आन्‌ मायेचा गा झरा गेला आटलाया पाझर
मायेचा गा झरा गेला आटलाया पाझर
मातीवाणी काळं कोणी दुधावाणी पांढरं
धनगराची मेंढरं गा धनगराची मेंढरं
धनगराची मेंढरं गा धनगराची मेंढरं

WRITERS

Jagdish Khebudkar, Kadam Ram

PUBLISHERS

Lyrics © IPRS

Share icon and text

Share


See A Problem With Something?

Lyrics

Other

From This Artist