मनाला मनाची ओढ लागते पुन्हा पुन्हा
मनाला मनाचे वेड लागते पुन्हा पुन्हा
तुझे रूप असावे खळखळनाऱ्या मुक्त झऱ्याचे
तुझे स्पर्श असावे विरघळनाऱ्या शुभ्र धुक्याचे
हातात हात घे जरा ये जवळ ये ना जरा
स्वप्न साकारले हे जणू आभास झाला खरा
कधी तोल जावा कधी सावरावा हे पांघरून घेऊ चांदणे
या तुझ्या चाहूलीनी मुके शब्द होती बोलू लागतात स्पंदने
तुझे श्वास असावे दळवळनारे गंध फुलांचे
तुझे प्रेम असावे उलगडणारे बंध मनाचे
इशारा हवासा रोज छेडतो पुन्हा पुन्हा
WRITERS
HRISHIKESH, JASRAJ, SAURABH, MANDAR CHOLKAR